Login

भुतबंगल्याचा कहर | भयकथा | भाग ३

It Is A Story Of Haunted House Of Witch And A Family.
भुतबंगल्याचा कहर | भयकथा | भाग ३

साहिल अनिकेतला घेऊन तसाच घरी आला. अनिकेत झाल्या प्रकाराला भरपूर घाबरला होता. तो काहीच बोलत नव्हता त्याला ताप भरून आला.

त्याला त्या अवस्थेत बघताच सुगंधा घाबरून गेली. साहिलने तिला त्याची काळजी घ्यायची सांगून डॉक्टरांना बोलावून घेतलं. विशाल ही आता पर्यंत घरी आला होता.

डॉक्टरांनी येऊन त्याला तपासून औषधे दिली. ती औषध घेऊन अनिकेत झोपी गेला. तो झोपल्यावर साहिल झाला प्रकार विशाल आणि सुगंधाला सांगू लागला. तो सांगत असताना दाराची बेल वाजली. सुगंधाने दरवाजा उघडला समोर शेजारच्या बाई आणि दीपा होती. त्या अनिकेतची विचारपूस करायला आल्या होत्या. त्यांना देखील साहिलने सगळं सांगितलं.

सगळं सांगून साहिल त्या दोघींना विचारू लागला,"त्या घराचं नक्की काय रहस्य आहे? काय प्रकार आहे हा असं काय आहे तिथे? आम्हाला तुम्ही सांगाल का प्लिज?" साहिल त्यांना विनंती करू लागला.

त्याच बोलणं ऐकून त्या दोघी एकमेकींकडे बघू लागल्या आणि मग थोडा वेळ थांबून अबोलीची आई घाबरून बोलू लागली,"हा सगळा खूप भयानक विचित्र प्रकार आहे. कोणी ह्या विषयी इथे बोलायला देखील घाबरतात. ह्या आधी दोन मुले अशीच तिथे आत गेलीत आणि कधीच बाहेर आली नाहीत. त्यांचं काय झालं कुठे गेलेत कोणाला काहीच कळलं नाही. त्यांच्या घरच्यांनी खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. तिथे जे काही आहे ते कोणालाच आत येऊ देत नाही."

हे ऐकताच साहिलला प्रश्न पडला तो बोलू लागला,"असं आहे तर मग मला कसं काय जाता आलं आत? मी अगदी सहज आत जावून सहज बाहेर आलो."
त्याच्या बोलण्याचा सगळ्यांना प्रश्न पडला.

इतक्यात दिपाच लक्ष साहीलच्या हाताकडे गेलं. त्याच्या हातात कसला तरी लाल धागा होता. तिने त्याला तो धागा कसला असल्याचं विचारलं. त्या वर त्याने सांगितले,"हॉस्टेलला असताना मी इथे जवळच माझ्या मित्राच्या गावी एका देवस्थानाला गेलो होतो. तिथे एका मंदिरात गुरुजींनी मला हा बांधायला दिला होता. बांधताना ते मला बोलले होते की भविष्यात हा धागा माझं रक्षण करेल."

त्याच ते बोलणं ऐकून दीपा त्याला बोलू लागली,"हो म्हणजे मग ह्यामुळेच तुला काही झालं नाही तू सुखरूप बाहेर आलास." तिचं बोलणं सगळ्यांना पटलं.

साहिलने निताला त्या घरा बद्दल पुढे सांगायला सांगितले. ती पुढे बोलू लागली,"काही वर्षांपूर्वी तिथे एक म्हातारी राहत होती एकटीच, तिची मुलं तिला सोडून बाहेर गावी राहत होते. ती मुलं वाईट होती असं नाही पण ही म्हातारी अमावस्या पौर्णिमेला रात्रीची काही तरी काळा जादू करायची ती गोष्ट तिच्या मुलांना कळली होती त्यांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला पण ती काही कोणाचं ऐकत नव्हती. तिला ती विद्या करून पुन्हा बऱ्याच वर्षांनी लहान व्हायचे होते अमर व्हायचे होते. तिचे हे वेड काही कमी होत नव्हते. त्यात तिला तिची विद्या पूर्ण करायची म्हणून लहान मुलांचा बळी द्यायचा होता. ही गोष्ट जेव्हा तिच्या मुलांना कळली तेव्हा ते त्यांच्या मुलांना घेऊन बऱ्याच लांब निघून गेले. तिला इथेच एकटीला ठेवून. अगदी तिचा मृत्यू झाला तरी ते कोणी आले नाहीत. तिचा मृत्यू देह अजून हि आतच आहे त्याला अंत्यसंस्कार देखील नाही मिळाला.
अजुन पर्यंत बाहेरचं कोणी आत जाण्याची हिम्मत नाही केली. एकदा असाच एक लहान मुलगा तिथून जात असताना त्याला अनिकेत सारखच आत ओढून घेतलं तो कधीच बाहेर आला नाही. दुसऱ्या वेळेस ही असच घडल. त्यांच्या घरच्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना परत घेऊन येणं काही शक्य झालं नाही. म्हणून सगळ्यांनी मिळून ते घर पाडायचं ठरवलं. पण तेव्हा देखील तिथे अनर्थच घडला ते घर तोडायला आलेल्या गाड्याच उलट्या झाल्या. म्हणून सगळ्यांच्या संमतीने एका गुरुजींना बोलावून ते घर तात्पुरती मंतरून बंद करण्यात आले. त्या दिवसापासून काही विचित्र घडले नव्हते ते आज घडले."

त्यांचं बोलणं ऐकून दीपा आणि साहिल एकमेकांकडे बघू लागले त्यांना माहीत होत त्या घराचा दरवाजा कोणी उघडला होता ते. काही वेळ गप्पा करून त्या दोघी त्यांच्या घरी निघून गेल्या.

विशाल आणि सुगंधा देखील अनिकेत जवळ झोपायला निघून गेले. साहिल त्याच्या रूम मध्ये निघून गेला. तो निघून गेला पण त्याच मन थाऱ्यावर नव्हते. तो त्या घराबद्दलच विचार करत होता. ह्या सगळ्याबद्दल विचार करत होता.

रात्र होताच कसल्याश्या आवाजाने सुगंधाला जग आली. तिने बाजूला बघितले तर अनिकेत तिथे नव्हता. तिने घाबरून विशालला उठवलं आणि अनिकेत नसल्याचं सांगितलं. ते दोघेही घरभर अनिकेतचा शोध घेऊ लागले. ते शोध घेत साहिलच्या रूम मध्ये गेले पण तो ही तिथे नव्हता. दोघे ही अतिशय घाबरून गेले.

घरा बाहेर येऊन ते अनिकेत आणि साहिलला हाका मारू लागले. त्यांचा आवाज ऐकून शेजारचे ही बाहेर आले. त्यांना त्यांनी झाला प्रकार सांगितला. ते देखील त्यांच्या सोबत मिळून त्यांचा शोध घेऊ लागले.

तेव्हा अचानक त्यांच्या इथली सगळी वीज गेली आणि सर्वत्र अंधार पसरला. अगदी बाजूच देखील त्यांना काही दिसेनासं झालं इतका अंधार पसरला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आज अमावस्यची रात्र आहे आणि ते आणखीनच घाबरून गेले.

सगळे टॉर्च घेऊन बाहेर रस्त्यावर त्यांना शोधायला निघाले. इतक्यात त्यांना त्यांच्या दिशेला एक बाईक येताना दिसली. ती जवळ येताच त्यांना त्यावर साहिल दिसला आणि त्याच्या मागे कोण होते ते स्पष्ट दिसत नव्हते.

त्याला बघताच सगळे जाणं त्याला अनिकेत कुठे असल्याचं विचारू लागले. सर्वांच्या प्रश्नावर त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह दिसू लागले. सगळे काय बोलत आहेत त्याला समजेनासे झाले. तेव्हा तो सर्वांना सांगू लागला,"मला नाही माहित अनिकेत कुठे आहे मी तर एकता बाहेर निघालो होतो कामासाठी. दादा काय झालंय अनिकेत कुठे आहे सांग मला लवकर?"

त्याच्या त्या प्रश्नावर विशालने त्याला अनिकेत कुठेच सापडत नसल्याचं सांगितलं. त्यावर साहिलला सर्व गोष्ट लक्षात आली आणि तो बाईक चालू करून निघू लागला.

निघता निघता सर्वांना त्याने त्या घरा जवळ बोलावून घेतलं. काही वेळातच साहिल त्या सोबत आणलेल्या माणसा सोबत त्या घरा जवळ पोहोचला त्यांच्या मागून विशाल, सुगंधा आणि त्यांच्या शेजारचे देखील पोहोचले.

तिथे पोहोचताच अचानक जोरात वारा वीज पाऊस सुरू झाला. गर्मीचे दिवस असताना हा असा अचानक वीज पाऊस बघून सगळे घाबरून गेले.

तिथे पोहोचताच साहिलने त्याच्या सोबत असलेले त्याचे तेच गुरुजी आहेत ज्यांनी त्याला हा धागा दिला होता, ते असल्याचे त्याने सर्वांना सांगितले. तेवढच सांगून सर्वांना बाहेरच थांबायची विनंती करून तो त्या गुरुजींसोबत त्या घरात निघून गेला.

क्रमशः

🎭 Series Post

View all